साताऱ्यात छत्रपती शिवराय यांच्या घराण्यातील राजकीय मतभेद सर्वदूर आहेत, पण खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी मोठेपणा दाखवून साताऱ्यातील सेल्फी पॉईंट ला भेट देऊन राजकीय दरी दूर करण्यासाठी प्रयत्न केला आहे.
सातारा : साताऱ्यात छत्रपती शिवराय यांच्या घराण्यातील राजकीय मतभेद सर्वदूर आहेत, पण खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी मोठेपणा दाखवून साताऱ्यातील सेल्फी पॉईंट ला भेट देऊन राजकीय दरी दूर करण्यासाठी प्रयत्न केला आहे.
सातारा शहरात गजबजलेल्या पोवई नाका येथे भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी काही दिवसांपूर्वी स्वखर्चातून सेल्फी पॉईंट उभारला आहे. मंगळवारी सायंकाळी सहा वाजता आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन होणार होते. त्या आधीच आज भाजपचे राज्यसभेचे खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी सेल्फी पॉईंटची पाहणी केली. तसेच आपले कट्टर समर्थक सुनिल काटकर, ऍड. डी. जी. बनकर यांच्या समवेत सेल्फी पॉईंटसह त्वरित छायाचित्रही काढली.
साताऱ्यातील अनेक राजकीय पक्षांच्या महिलांनी सातारा शहरातील पोवई नाका येथे महिलांसाठी बाथरूमची व्यवस्था करण्याची काही वर्षांपूर्वी जोरदार मागणी केली होती. त्या विषयांवर पडदा पडला असून आता सेल्फी पॉईंटवर सेल्फी घेण्यासाठी काही महिला संघटनांनी इच्छा व्यक्त केली आहे, असे समजते. दरम्यान, दोन्ही राजांनी एकत्र कायम स्वरूपी आल्यास सातारा शहराचा विकास होईल, अशी अपेक्षा अमोल गंगावणे, शुभम कांबळे, महेश काळे, सागर सावंत व समर्थकांनी केली आहे.


