शिवाजीनगर, ता. सातारा गावच्या हद्दीत दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
सातारा : शिवाजीनगर, ता. सातारा गावच्या हद्दीत दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, विशाल बाळकृष्ण चव्हाण वय २३, रा. कुसवडे, ता. सातारा हा दुचाकीवरुन जात असताना शिवाजीनगर गावच्या हद्दीत समोरून येणाऱ्या दुचाकी बरोबर झालेल्या अपघातात गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.


