maharashtra

स्वारगेट-सातारा बसवर अज्ञातांनी केली दगडफेक


Unidentified persons pelted stones at Swargate-Satara bus
पुण्याहून साताराकडे येणार्‍या स्वारगेट सातारा बसवर अज्ञातांनी दगडफेक केली असल्याची घटना वाढेफाटा येथील उड्डाणपुलाजवळ दिनांक 23 रोजी रात्री दहा वाजता घडली. याप्रकरणी अज्ञातावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सातारा : पुण्याहून साताराकडे येणार्‍या स्वारगेट सातारा बसवर अज्ञातांनी दगडफेक केली असल्याची घटना वाढेफाटा येथील उड्डाणपुलाजवळ दिनांक 23 रोजी रात्री दहा वाजता घडली. याप्रकरणी अज्ञातावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
बस चालक प्रदीप यशवंत शिंदे (वय 40, रा. पाटखळ, ता. सातारा) हे मंगळवारी रात्री स्वारगेट-सातारा बस घेऊन सातार्‍याकडे येत होते. वाढे फाट्यावर आल्यानंतर त्यांच्या बसवर अज्ञातांनी दगडफेक केली. मात्र सुदैवाने हा दगड कोणालाही लागला नाही. चालक शिंदे यांनी अशा परिस्थितीत ही बस न थांबवता थेट बसस्थानकात आणली. त्यामुळे अनुचित प्रकार घडला नाही. घडलेल्या प्रकाराची माहिती त्यांनी सातारा बसस्थानकातील वरिष्ठ अधिकार्‍यांना दिल्यानंतर त्यांना सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार देण्याचे सांगण्यात आले. त्यानंतर प्रदीप शिंदे यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात येऊन त्यांनी अज्ञाताच्या विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी वाढेफाटा परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम हाती घेतले आहे.