maharashtra

जिल्हा परिषदेच्या गट व गणांची नव्याने रचना

जिल्ह्यात ६४ ऐवजी ७३ जिल्हा परिषद सदस्य निवडून येणार; गणांची संख्या १४६ वर

New structure of Zilla Parishad groups and counties
जिल्हा परिषदेच्या गट व गणांची सन २०११ च्या लोकसंख्येनुसार नव्याने रचना करण्यात आली असून गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयातून याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली. आता जिल्ह्यात ६४ ऐवजी ७३ जिल्हा परिषद सदस्य निवडून येणार असून गणांची संख्या १४६ वर पोचली आहे.

सातारा : जिल्हा परिषदेच्या गट व गणांची सन २०११ च्या लोकसंख्येनुसार नव्याने रचना करण्यात आली असून गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयातून याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली. आता जिल्ह्यात ६४ ऐवजी ७३ जिल्हा परिषद सदस्य निवडून येणार असून गणांची संख्या १४६ वर पोचली आहे. येत्या काही दिवसांतच निवडणुकीचा बिगूल वाजणार असून गट, गणरचना झाली. आता इच्छुकांचे लक्ष आरक्षणाकडे आहे.
जिल्हा परिषदेच्या सदस्यांचा कार्यकाल मार्च २०२२ मध्ये संपला. त्यानंतर प्रशासक म्हणून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सूत्रे हाती घेतली. राज्य शासनाने कायदा करून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षण मिळण्यासाठी निवडणूक पुढे ढकलली. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण प्रारूप प्रभाग रचनेचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने दि. १० मे रोजी जाहीर केला होता.
नवीन लोकसंख्येच्या निकषानुसार सातारा जिल्हा परिषदेतील गटांची संख्या ६४ वरून ७३ वर पोहोचली आहे. निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार गुरुवारी नवीन गटांची व गणांची व त्यामधील गावांची नावे जाहीर करण्यात आली.
मोठी उलथापालथ
जिल्ह्यात तालुक्याचे ठिकाण असलेल्या गावांच्या नगरपंचायती झाल्याने तसेच सातारा शहरालगतची खेड ग्रामपंचायत झाल्याने अनेक गावे जुन्या गटातून नव्या गटात गेली तर अनेक गावांचा नवा गट, नवा गण निर्माण झाल्याने मोठी उलथापालथ झाली आहे. या गावांमधून पंचायत समिती, जिल्हा परिषदेसाठी इच्छुकांची आता मोठी कसोटी लागणार आहे. त्यातच आरक्षण अनुकूल आले तर ठिक अन्यथा गेल्या काही महिन्यांपासून केलेली जुळणी वाया जाऊन पुन्हा पाच वर्षे हात चोळत बसावे लागणार आहे.
तालुकानिहाय गट व गणांची नावे पुढीलप्रमाणे: सातारा तालुका: एकूण गट: १० गट लिंब-गण लिंब व पानमळेवाडी, गट पाटखळ-गण शिवथर, पाटखळ, गट खेड-गण खेड, वनवासवाडी, गट कोडोली- गण कोडोली, संभाजीनगर, गट कोंडवे-गण कोंडवे, जकातवाडी, गट: कारी गण कारी, अंबवडे बुद्रुक, गट पाडळी गण पाडळी, शेंद्रे, गट: देगाव गण देगाव, वर्णे, गट: अपशिंगे-गण अपशिंगे, अंगापूर वंदन, गट नागठाणे गण नागठाणे व अतीत.

खटाव तालुक्यात सिद्धेश्वर कुरोली गट वाढला आहे. एकूण गट ८ नवीन गट पुढीलप्रमाणे गट बुध- गण डिस्कळ, बुध, गट:
पुसेगाव- गण पुसेगाव, विसापूर, गट खटाव-गण खटाव, तडवळे, गट निमसोड- गण एनकूळ, निमसोड, गट सिद्धेश्वर कुरोली- गण सिद्धेश्वर कुरोली, गुरसाळे, गट औघ-गण जायगाव, औघ, गट पुसेसावळी गण पुसेसावळी, म्हासुर्णे, गट मायणी गण मायणी, - कलेढोण.

कोरेगाव तालुका: एकूण गट ६ गट: पिंपोडे गण पिंपोडे बुद्रुक, सोनके, गट वाठारस्टेशन गण वाठारस्टेशन, देऊर, गट सातारारोड - गण सातारारोड, किन्हई, गट कुमठे कण कुमठे, ल्हासुर्णे, गट एकंबे-गण एकंबे, अपशिंगे, गट वाठार किरोली गण वाठार किरोली, साप.

वाई तालुका: एकूण गट ५ गट: पसरणी गण पसरणी, धोम, गट बोपर्डी- गण बोपडी, शहाबाग, गट ओझर्डे-गण कवठे, ओझर्डे, गट बावधन गण बावधन, यशवंतनगर, गट भुईज गण भुईंज, जांब.

महाबळेश्वर २ गट: गट तळदेव गण तळदेव, कुंभरोशी, गट भिलार - गण भिलार, मेटगुताड.

जावली: ३ गट गट म्हसवे गण खर्शी बारामुरे, म्हसवे, गट कुडाळ-गण कुडाळ, सायगाव, गट कुसुंबी गण कुसुंबी, आंबेघर त. मेढा.

पाटण एकूण गट ८ गुट गोकूळ तर्फ हेळगाव- गोकुळ तर्फ हेळगाव, वाटोळे, गट तारळे- गण तारळे, मुरुड, गट महावशी गण म्हावशी, चाफळ, गट मल्हारपेठ- गण मल्हारपेठ, नाडे, गट नाटोशी गण नाटोशी, येराड, गट मारुल हवेली गण मरळी, मारुल हवेली, गट मुंडळ कोळे गण मुंद्रळकोळे, जिंती, गट धामणी गण धामणी, तायगडेवाडी.

कराड तालुका: गट १४: गट पाल गण पाल, इंदोली, गट
उंब्रज-गण उंब्रज, कोर्टी, गट मसूर गण किवळ, मसूर, गट कोपर्डे हवेली गण वाघेरी, कोपर्डे हवेली, गट चरेगाव- गण चरेगाव, तळबीड, गट तांबवे गण तांबवे, सुपने, गट-विंग गण कोळे, विंग, गट वारुंजी गण वारुंजी, कोयना वसाहत, गट सैदापूर-गण सैदापूर, हजारमाची, गट कार्वे-गण, कार्वे, गोळेश्वर, गट वडगाव हवेली- गण वडगाव हवेली, शेरे, गट रेठरे बुद्रुक - गण रेठरे बुद्रुक, आटके, गट: काले-गण काले, ऑड, गट येळगाव गण येळगाव, उंडाळे.

खंडाळा तालुका: एकूण गट ३: गट शिरवळ गण शिरवळ, पळशी, गट भादे-गण भादे, नायगाव, गट: खेड बुद्रुक गण खेड बुद्रुक, बावडा.

फलटण तालुका: एकूण गट ९: गट तरडगाव गण पाडेगाव, तरडगाव, गट साखरवाडी (पिंपळवाडी) - गण साखरवाडी (पिंपळवाडी), जिंती, गट सांगवी गण सांगवी, सस्तेवाडी, गट विडणी - गण विडणी, राजाळे, गट गुणवरे गण गुणवरे, आसू, गट बरड- गण बरड, दुधेबावी, गट कोळकी गण कोळकी गिरवी, गट वाठार निंबाळकर - गण वाठार निंबाळकर, सुरवडी, गट हिंगणगाव- गण हिंगणगाव, सासवड.

माण तालुका: एकूण गट ४: गट आंधळी गण आंधळी, मलवडी, गट बिदाल गण बिदाल, वावरहिरे, गट मार्डी-गण मार्डी, वरकुटे-म्हसवड, गट गोंदवले बुद्रुक - गण गोंदवले बुद्रुक, पळशी, गट कुकुडवाड गण कुकुडवाड, वरकुटे मलवडी.
दरम्यान, ही रचना पक्षपाती झाली असून अधिकारी की राजकीय कार्यकर्ते, असा आरोप करत वेळप्रसंगी न्यायालयात जाण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते अनिल पवार यांनी दिला आहे.