maharashtra

साताऱ्यात गांजाच्या अड्डयावर छापा

अडीच लाखांचा गांजा व इतर साहित्य जप्त

सातारा शहर व परिसरात पोलिसांनी दोन ठिकाणी गांजाच्या अड्डयावर छापा टाकून याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.  यावेळी त्यांच्याकडून अडीच लाखांचा गांजा व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. गणेशोत्सवाच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सर्च ऑपरेशन राबवून अंमली पदार्थाचा साठा जप्त केला.

सातारा : सातारा शहर व परिसरात पोलिसांनी दोन ठिकाणी गांजाच्या अड्डयावर छापा टाकून याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.  यावेळी त्यांच्याकडून अडीच लाखांचा गांजा व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. गणेशोत्सवाच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सर्च ऑपरेशन राबवून अंमली पदार्थाचा साठा जप्त केला.
गांजा विक्रीप्रकरणी पोलिसांनी अतूल संथनाथ कबाडे वय ३५, रा. गुरुवार पेठ, सातारा याला ताब्यात घेऊन त्याच्यावर अंमली पदार्थ अवैधसाठा प्रकरणी गुन्हा दाखल केला. या प्रकरणी पोलिसांनी वैभव रघुनाथ वय ३२, रा. नागाचे कुमठे, औंध, ता, खटाव, जि. सातारा याला ताब्यात घेतले. त्याच्यावरही पोलिसांनी अंमली पदार्थ अवैध साठाप्रकरणी गुन्हा दाखल केला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, साताऱ्यातील गुरुवार पेठेतील एका मस्जिदजवळ गांजाचा साठा असल्याची माहिती सातारा शहर पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी दि. ३० रोजी दुपारी साडेबारा वाजता छापा टाकला. यावेळी पोलिसांना प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये गांजाच्या पुड्या सापडल्या. याची किंमत सुमारे १४ हजार ३३० रुपये आहे. हा गांजा विक्रीप्रकरणी पोलिसांनी अतूल संथनाथ कबाडे वय ३५, रा. गुरुवार पेठ, सातारा याला ताब्यात घेऊन त्याच्यावर अंमली पदार्थ अवैधसाठा प्रकरणी गुन्हा दाखल केला. तसेच पोलिसांनी दुसरी कारर्वाइ औद्योगिक वसाहतीमधील एका लेथ मशीन वर्कशॉपमध्ये करण्यात आली. या वर्कशॉपमध्ये अंमली पदार्थाचा साठा असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी दि. २९ रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास तेथे छापा टाकला. यावेळी पोलिसांना वेगवेगळ्या प्रकारचा गांजा आढळून आला. या गांज्याची किंमत २ लाख ३३ हजार १८० रुपयांची आहे. या प्रकरणी पोलिसांनी वैभव रघुनाथ वय ३२, रा. नागाचे कुमठे, औंध, ता, खटाव, जि. सातारा याला ताब्यात घेतले. त्याच्यावरही पोलिसांनी अंमली पदार्थ अवैधसाठाप्रकरणी गुन्हा दाखल केला.