पार्ले ता. कराड येथे तिघांना मारहाण केल्याची घटना घडली. सोमवारी ७ रोजी सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास सांडपाण्याच्या कारणावरून चिडून जाऊन तिघांनी संगनमताने ही मारहाण केली. याबाबतची फिर्याद श्रीमती मैनाबाई दादासो नांगरे (वय 62) रा. पार्ले ता. कराड यांनी कराड ग्रामीण पोलिस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार याप्रकरणी तिघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
कराड : पार्ले ता. कराड येथे तिघांना मारहाण केल्याची घटना घडली. सोमवारी ७ रोजी सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास सांडपाण्याच्या कारणावरून चिडून जाऊन तिघांनी संगनमताने ही मारहाण केली. याबाबतची फिर्याद श्रीमती मैनाबाई दादासो नांगरे (वय 62) रा. पार्ले ता. कराड यांनी कराड ग्रामीण पोलिस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार याप्रकरणी तिघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
लिलाबाई विठ्ठल नांगरे, रूपाली संतोष नांगरे व संतोष विठ्ठल नांगरे सर्व रा. पार्ले ता. कराड अशी गुन्हा नोंद झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, फिर्यादी मैनाबाई नांगरे यांची जाऊ लिलाबाई त्यांच्या शेजारी वास्तव्यास आहेत. सोमवारी सकाळी लिलाबाई ही मैनाबाई यांच्या घराजवळ येऊन मैनाबाईच्या सुनेस येथे पाणी का सोडले? असे म्हणून त्यांनी भांडण सुरू केले. यावेळी भांडणाचा आवाज ऐकून मैनाबाई बाहेर आल्या. यावेळी लिलाबाई, तिची सून रूपाली व मुलगा संतोष हे तेथे होते. त्यावेळी लिलाबाई ही पूजा हिस झटापट करीत होती. त्यामुळे मैनाबाई भांडण सोडविण्यासाठी गेली असता रूपाली हिने लोखंडी कुबडी डोक्यात मारून मैनाबाईला जखमी केले.
त्यावेळी मैनाबाईचा मुलगा सचिन हा तेथे आला असता त्यालाही रूपालीने कुबडी डोक्यात व हातावर मारून जखमी केले. तसेच मैनाबाईची सून पूजा हिस कुबडीने मारून जखमी केले. त्याचबरोबर लिलाबाई, रूपाली व संतोष या तिघांनी मैनबाईच्या कुटुंबास येथे यायचे नाही; नाहीतर तुम्हाला ठेवत नाही, अशी दमदाटी केली. याबाबत मैनाबाई दादासो नांगरे यांनी कराड ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तिघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार बैले अधिक तपास करीत आहेत.


