threebeatenatparle

esahas.com

पार्ले येथे तिघांना मारहाण

पार्ले ता. कराड येथे तिघांना मारहाण केल्याची घटना घडली. सोमवारी ७ रोजी सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास सांडपाण्याच्या कारणावरून चिडून जाऊन तिघांनी संगनमताने ही मारहाण केली. याबाबतची फिर्याद श्रीमती मैनाबाई दादासो नांगरे (वय 62) रा. पार्ले ता. कराड यांनी कराड ग्रामीण पोलिस ठाण्यात  दिली आहे. त्यानुसार याप्रकरणी तिघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.