maharashtra

जनरल बिपिन रावत यांचे कार्य देश कायम स्मरणात ठेवेल

प्राचार्य डॉ. राजमाने : स.गा.म.तर्फे कुन्नूर येथील हेलिकॉप्टर दुर्घटनेतील वीर जवानांना श्रद्धांजली

The country will always remember the work of General Bipin Rawat
जनरल बिपिन रावत यांनी भारताच्या संरक्षण दलामध्ये अमुलाग्र बदल घडवून आणला. ते भारतीय लष्कराचे २६ वे लष्करप्रमुख होते. महाराष्ट्राचा आणि त्यांचा फार जिव्हाळ्याचा संबंध होता. त्यांच्या निधनाने देशाची फार मोठी हानी झाली असून त्यांचे कार्य देश कायम स्मरणात ठेवेल, असे मत सदगुरु गाडगे महाराज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन राजमाने यांनी व्यक्त केले.

कराड : जनरल बिपिन रावत यांनी भारताच्या संरक्षण दलामध्ये अमुलाग्र बदल घडवून आणला. ते भारतीय लष्कराचे २६ वे लष्करप्रमुख होते. महाराष्ट्राचा आणि त्यांचा फार जिव्हाळ्याचा संबंध होता. त्यांच्या निधनाने देशाची फार मोठी हानी झाली असून त्यांचे कार्य देश कायम स्मरणात ठेवेल, असे मत सदगुरु गाडगे महाराज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन राजमाने यांनी व्यक्त केले.
येथील रयत शिक्षण संस्थेच्या सदगुरु गाडगे महाराज महाविद्यालयात गुरुवारी १६ रोजी संरक्षणदल प्रमुख जनरल बिपिन रावत व १३ वीर जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी महाविद्यालयातील एन.सी.सी., एन.एस.एस., महिला मिलिटरी अकादमी, सर्व शिक्षक, शिक्षकेतर सेवक व विद्यार्थी उपस्थित होते.
प्राचार्य डॉ. राजमाने म्हणाले, जनरल बिपिन रावत यांनी भारताच्या तिन्ही दलामध्ये एकसूत्रता घडवून आणली. त्यांनी १ जानेवारी १९२० पासून सीडीएस म्हणून पदभार स्वीकारला. ते भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ होते. त्यांच्या अपघाती जाण्याने देशाचे फार मोठे नुकसान झाले आहे.
दरम्यान, प्राचार्य राजमाने यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करून जनरल बिपिन रावत, त्यांच्या पत्नी यांच्यासह १३ वीर जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.