maharashtra

बळीराजा 1 जानेवारी 2022 हा दिवस काळा दिवस म्हणून साजरा करणार

पंजाबराव पाटील : गावात शेतकऱ्यांनी महाआघाडी सरकारचा निषेध करण्याचेही आवाहन

Baliraja will celebrate 1st January 2022 as Black Day
बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने आझाद मैदान (मुंबई) येथे गुरुवार 23 डिसेंबर रोजी शेतकऱ्यांची गारानी मांडण्यासाठी आंदोलन करण्यात आले. त्याठिकाणी दिवसभर थांबूनही सरकारने शेतकऱ्यांचे गाराने ऐकले नाही. त्यामुळे  राज्यातील आघाडी सरकारच्या निषेधार्थ बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने १ जानेवारी २०२२ हा दिवस काळा दिवस म्हणून साजरा करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

कराड : बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने आझाद मैदान (मुंबई) येथे गुरुवार 23 डिसेंबर रोजी शेतकऱ्यांची गारानी मांडण्यासाठी आंदोलन करण्यात आले. त्याठिकाणी दिवसभर थांबूनही सरकारने शेतकऱ्यांचे गाराने ऐकले नाही. त्यामुळे  राज्यातील आघाडी सरकारच्या निषेधार्थ बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने १ जानेवारी २०२२ हा दिवस काळा दिवस म्हणून साजरा करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, सध्या, शेतकरी अनेक अडचणींचा सामना करीत आहे. परंतु, सरकारला त्यांचे प्रश्न ऐकून घ्यायला वेळ नाही. यासाठी गुरुवार 23 डिसेंबर रोजी आझाद मैदान (मुंबई) येथे शेतकऱ्यांची गारानी मांडण्यासाठी बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. मात्र, त्याठिकाणी दिवसभर थांबूनही सरकारने शेतकऱ्यांचे गाराने ऐकून घेतले नाही. याचा निषेध म्हणून बळीराजा शेतकरी संघटना राज्यातील आघाडी सरकारचा एक जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी काळा दिवस साजरा करून निषेध नोंदवणार आहेत.
त्यानुसार राज्यभरातील शेतकऱ्यांनी १ जानेवारी २०२२ रोजी आपल्या गावात एकत्र जमुन महाआघाडी सरकारचा जाहीर निषेध करावा, असे आवाहनही बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने पंजाबराव पाटील यांनी केले आहे.