सातारा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कंटेनरमधील अज्ञात चालकाने इरटीका कारला धडक देऊन झालेल्या अपघातात तीन जणांना जखमी केल्याप्रकरणी कंटेनर चालकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा : सातारा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कंटेनरमधील अज्ञात चालकाने इरटीका कारला धडक देऊन झालेल्या अपघातात तीन जणांना जखमी केल्याप्रकरणी कंटेनर चालकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १२ ऑगस्ट रोजी ५.३० वाजण्याच्या सुमारास पुणे- बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर सातारा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत इरटीका कार क्रमांक एम.एच.५० इक्यु ९१७७ मधून श्रीमती शकुंतला सणस, वय ८०, ज्योती भालेराव, वय ४०, उत्तम किसन सणस, वय ५८ हे कोल्हापूरकडे जात असताना कंटेनर क्रमांक आर. जे. १४.जीके ३८६२ मधील अज्ञात चालकाने कारला धडक देऊन शकुंतला सणस यांच्या दुखापतीला कारणीभूत ठरला व कारचे नुकसान केल्याची तक्रार सुमित तारीख रा. कल्याण (मुंबई) याने सातारा शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.


