कोरेगाव तालुक्यातील वाठार स्टेशन परिसरात आज दुपारी दोनच्या सुमारास अवकाळी पावसाची हजेरी लावत अक्षरशः गारांचा पाऊस झाला आहे. रस्त्यावर आणि शेतात बर्फाचा खच साठला होता. मात्र, गारपिटीमुळे कांदा उत्पादक, कलिंगड व द्राक्षबागांबरोबर इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
कोरेगाव तालुक्यात कोरोनाबाधितांच्या संख्येचा आलेख वाढतच चालला आहे. राज्य शासन आणि जिल्हा प्रशासनाने केलेले नियम पाळले जात नसल्याने बाजारपेठेत गर्दी वाढत चालली आहे. प्रांताधिकारी तथा इन्सिडंट कमांडर ज्योती पाटील यांच्या नेतृत्वाखाली महसूल, पोलीस आणि नगरपंचायत प्रशासनाने गुरुवारी सायंकाळी संयुक्त कारवाई करत दहा दुकानांसह एक कोचिंग क्लास सील केला.
‘शहीद भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांनी वयाच्या केवळ 23व्या वर्षी देशासाठी केलेले बलिदान अत्यंत प्रेरणादायी आहे. त्यांचे अतुलनीय धैर्य आणि शौर्य तरुण पिढीला दीपस्तंभाप्रमाणे आहे,’ असे प्रतिपादन विस्तार अधिकारी यशेंद्र क्षीरसागर यांनी केले.
येथील जुना मोटार स्टँड परिसरात नगरपंचायतीने उभारलेले सार्वजनिक स्वच्छतागृह खुले करण्याच्या मागणीसाठी ‘सोनेरी ग्रुप’ने अभिनव पद्धतीने भीक मांगो आंदोलन छेडले. हलगीच्या निनादात बाजारपेठेत त्यांनी भीक गोळा केली. या आंदोलनाची दिवसभर शहरात चर्चा होती.
‘महिलांनी समाजाचा सांस्कृतिक वारसा उंचावलेला आहे. व्यवस्थापनातील एमबीएची पदवी घेऊनही जेवढे व्यवस्थापन कौशल्य येणार नाही त्यापेक्षाही कौटुंबिक आणि सामाजिक व्यवस्थापनाचे कार्य महिला नियमितपणे लिलया करीत असतात. महिलांच्या रोजच्या अतुलनीय कामकाजाची दखल कोठेही घेतली जात नाही. वास्तविक, महिलांना रोजच्या दैनंदिन कामकाजात सन्मान मिळाला पाहिजे. यासाठी समाजातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान होणे आवश्यक आहे. यातूनच महिलांना प्रोत्साहन मिळण्याबरोबर समाजात चांगला संदेश जाईल,’असे प्रतिपादन रोटरी क्लब ऑफ सातारचे
‘आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांचे संपूर्ण जीवनकार्य मार्गदर्शक आहे. त्यांच्या जीवनाचा प्रत्येक पैलू महत्त्वाचा आणि अनुकरणीय आहे,’ असे प्रतिपादन सांख्यिकी विस्तार अधिकारी यशेंद्र क्षीरसागर यांनी केले.
‘आपल्या देशामध्ये कोरोनाचे संकट भयंकर आक्राळविक्राळ रूप धारण करत आहे. अशा वेळी प्रथम फळीतील योद्धे म्हणून देशातील सर्व डॉक्टर्स, नर्सेस तसेच आरोग्य कर्मचार्यांनी फार मोलाचे कार्य केले. यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला, त्याचा आपल्या देशातील सर्वांना सार्थ अभिमान आहे. त्यामुळे कोरोना काळात आरोग्य विभागाचे कार्य उल्लेखनीय असून, त्यांच्या कार्याची इतर कोणाशी तुलना करता येणार नाही,’ असे प्रतिपादन कोरेगाव शहर विकास मंचचे अध्यक्ष किशोर बर्गे यांनी केले.
भारतीय अॅथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने रायपूर (छत्तीसगड) येथे नुकत्याच पार पडलेल्या 32 व्या वेस्ट झोन कनिष्ठ गट मैदानी स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघातून खेळणार्या मोहीत संतोष जगताप याने 2000 मिटर धावणे प्रकारात 6.4 मिनिटांची विक्रमी वेळ नोंदवत सुवर्णपदक पटकावले.
राज्यात विविध कारणांनी सातत्याने प्रकाशझोतात येत असलेल्या कोरेगाव नगरपंचायतीमध्ये सन 2019-20 मध्ये राबविण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानामध्ये आर्थिक अनियमितता व गैरव्यवहार झाला असून, त्याचे शासकीय लेखापरीक्षण करावे, त्याचबरोबर सखोल चौकशी करून दोषी असलेल्या अधिकारी व कर्मचार्यांवर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलितमित्र-समाज भूषण संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश येवले यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकार्यांकडे केली आहे.
‘आपण सर्वांनी मराठीचा आग्रह धरला पाहिजे. यासाठी इतर भाषांचा राग अथवा अपमान करण्याची गरज नाही. फक्त एवढेच भान असायला हवे की, आधुनिक युगातील पिढीमध्ये मातृभाषा असलेल्या मराठीची गोडी कमी होत चाललेली आहे. इंग्रजी ही प्रतिष्ठेची भाषा मानून मातृभाषेबद्दल कमीपणा वाटणे, मराठी भाषेचा परकेपणा वाटणे मराठी भाषिकांसाठी लाजिरवाणी बाब आहे. अमृताते पैजा जिंकणार्या आपल्या मराठीला समृद्ध वारसा आहे. तो समृद्ध वारसा जपण्याची व मराठीचे महत्त्व वाढविण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे,’ असे आवाहन डॉ. प्रभाकर पवार या