कुमठे : कोरेगाव शहराची कोरोना हॉटस्पॉटकडे वाटचाल सुरू असतानाच सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारींवरून नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी विजया घाडगे यांनी गुरुवारी शहरातील दोन चिकन सेंटर्ससह एका देशी दारू दुकानावर कारवाई केली. प्रत्येकी पाच हजार रुपये दंड आकारत पाच दिवसांसाठी ही दुकाने सील केली आहेत. राज्य शासनाने कोरोनाची दुसरी लाट थोपविण्यासाठी प्रभावी उपाययोजना केल्या आहे...
कोरेगाव नगरपंचायतीच्या अक्षम्य दुर्लक्षित कारभारामुळे पंतप्रधान आवास योजनेतील घरकुलांची कामे रखडली आहेत. नगरपंचायत विविध थातूर मातूर कारणे देऊन लाभार्थ्यांच्या तोंडाला पाने पुसत आहे, त्याच्या निषेधार्थ शनिवार, दि. 1 मे 2021 रोजी कोरेगाव तहसीलदार कार्यालयासमोर महाराष्ट्राच्या दिनाच्या ध्वजारोहणावेळी धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा लाभार्थ्यांनी दिला आहे.
देऊर-बिचुकले गावांना जोडणारा पक्का रस्ता व्हावा, ही गेली अनेक वर्षांपासूनची दोन्ही गावांची मागणी अखेर मंजूर झाली असून 2800 मी. रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण कामास प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे. लवकरच या दोन्ही गावांना जोडणारा मजबूत रस्ता तयार होणार आहे. यामुळे शेती तसेच शालेय मुले, नोकरदार लोकांचा प्रश्न सुटणार आहे.
कोरेगाव विधानसभा मतदार संघातील कोरेगाव, सातारा व खटाव तालुक्यांतील विविध गावांमधील मूलभूत सुविधांच्या कामासाठी 25/15 मधून पाच कोटी रुपयांची तरतूद ग्रामीण विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे. आ. शशिकांत शिंदे यांनी त्यासाठी पाठपुरावा केला होता. मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर झाल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
सातारा-लातूर महामार्गावर शहरातील साखळी पुलानजीक बाबुलाल लुणिया यांच्या चप्पल-बूट विक्री दुकानाला दुपारी 4च्या सुमारास आग लागली. आगीचे निश्चित कारण समजू शकले नाही. आगीमुळे दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाले आहे. नागरिकांच्या सतर्कतेमुळे आग वेळीच आटोक्यात आली. लगतची सर्व दुकाने आगीपासून वाचली.
कोरोना महामारीच्या संकटा बरोबर महागाईचा सामना करावा लागतं आहे. गतवर्षीपेक्षा यंदाच्या वर्षी जीवनावश्यक वस्तूंच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे. खाद्यतेलाच्या दरात गत दिवाळीपासून सत्तर टक्याने वाढ झाली असून, सध्याचे दर सामन्यांच्या आवाक्याबाहेर गेल्याने मासिक किराणा साहित्य व महिलांचे बजेट कोलमडले आहे. कोरोनाच्या संकटाचा सामना करताना, सामन्यांना महागाईला सामोरे जावे लागत आहे.
‘कोरेगाव तालुक्यातील एकंबे, बिचुकले आणि नलवडेवाडी (बिचुकले) या गावांची वाटचाल कोरोना हॉटस्पॉटकडे होती, मात्र आमदार शशिकांत शिंदे यांनी या गावातील कोरोनाबाधित रुग्णांसाठी संपूर्ण औषधोपचाराची कीट, ऑक्सिजन सिलिंडर आणि ऑक्सिजन मशीन व्यवस्था उपलब्ध करून देत चांगला निर्णय घेतला आहे,’ असे प्रतिपादन पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांनी केले.
कोरेगाव शहर आणि तालुक्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी धडक कारवाईस सुरुवात केली आहे. मंगळवारी सकाळी पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने 101 वाहनांवर कारवाई करत 20 हजारांहून अधिक दंड वसूल केला आहे. शासनाच्या निर्बंधांचे उल्लंघन करणार्यांवर कारवाईचा बडगा उगारल्याने खळबळ उडाली आहे.
जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण दिवसेंदिवस वाढू लागले आहे. बाधितांचा आकडा वाढू लागल्याने ग्रामीण भागांतील लोकांची झोप उडाली आहे. वाढत्या संख्येने मन धास्तावले आहेत. गजबजणार्या बाजारपेठा सुद्धा नि:शब्द होऊ लागल्या आहेत. बाधितांचा जिल्ह्याचा रोजचा आकडा हजाराच्या घरात जाऊ लागला आहे. गावे सुद्धा हॉटस्पॉट बनू लागली आहेत. एकीकडे गावागावांत ही संख्या वाढू लागल्याने चिंता व्यक्त केली जात आहेत. तर दुसरीकडे रोजी रोटीचे साधन बंद झाल्याने छोटे-मोठे व्यावसायिक परिस्थितीने निरुत्तर झाले आहेत.
उत्तर कोरेगाव तालुक्यात बुधवारी झालेल्या गारपिटीने शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. भांडवली खर्च असलेली पिके पूर्णपणे वाया गेली असून, नुकसानग्रस्त शेतकर्यांना भरीव मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन आ. दीपक चव्हाण यांनी नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केल्यानंतर शेतकर्यांना दिले.