मेडिकल, दवाखाने वगळता सर्व व्यवहार राहणार बंद
कराड : येत्या आठवड्यात यशवंतराव चव्हाण बहुऊद्देशीय हॉल, वडगाव हवेली ग्रामीण रुग्णालय, उंडाळे ग्रामीण रुग्णालय या 3 ठिकाणी 110 बेडची व्यवस्था करण्यात येणार आहे व येथेच कोरोना रुग्णांवर उपचार केले जातील. यापुढेही जशी गरज पडेल तशी बेड संख्या वाढविले जातील, अशी माहिती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देऊन ऑक्सिजन च्या तुटवड्याबाबत यावर उपाय म्हणून सरकारी जागांमध्ये ऑक्सि...
कोविडसाठी नव्हे मिरवण्यासाठीच कराडच्या नगराध्यक्षा ग्राऊंड लेव्हल काम करत असल्याचे सांगत आहे. मात्र त्या ग्राऊंडवर नव्हे तर मिरवण्यासाठीच काम करतात. कोणी वारले असले तरी त्या ठिकाणी भेट दिली की, त्याचे फोटो काढता हे मिरवणे नाही तर काय, त्याचप्रमाणे कोविडसाठी आपण फिरला असे म्हणता तर कोविडसाठी फिरणे नव्हते तर निव्वळ मिरवण्यासाठीच फिरत होतात, तेही वारंवार आम्ही सिद्ध केले आहे.- सौ. स्मिता हुलवान
कराड : सातारा जिल्ह्यातील गुन्हेगारी कारवाया मोडीत काढण्यासाठी व कायदा व सुव्यवस्था आबाधित राहण्याकरीता अभिलेखावरील गुन्हेगारी कृत्यांना प्रतिबंध करण्याकरीता कराड शहर पोलीस ठाणे अभिलेखावरील दोघांना सातारा जिल्ह्यातून एक वर्षाकरीता हद्दपार करण्यात आले. अमित हणमंत कदम सध्या (रा. होली फॅमिलीच्या पाठीमागे, वैभव कॉलनी, विद्यानगर, ता. कराड, मूळ रा. अंतवडी, ता. कराड) व शेखर उर्फ बा...
कराड: खा.श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून कराड येथील कोल्हापूर नाका ते कृष्णा पूल रस्त्याच्या कामासाठी साडेतीन कोटीचा भरीव निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे कराड शहरातून जाणा-या प्रमुख रस्त्याची सुधारणा होऊन नागरिकांचा प्रवास सुखकर होणार आहे. यासह कृष्णा पूलाचे संथ गतीने सुरू असलेले काम, कृष्णा पूला शेजारील रखडलेले संरक्षक भिंतीचे काम, सैदापूर ते ओगलेवाडी रस्त्याच्या बाजू...
कराड : शेती उत्पन्न बाजार समितीच्या गुळ मार्केटच्या 4 नं. गेटला कमान ऊभी करण्यात आलेली आहे. स्व.यशवंतराव चव्हाण यांची जन्म शताब्दी नुकतीच होऊन गेलेली आहे. या जन्म शताब्दी निमित्त शासनाने बाजार समितीच्या आवारात अनेक कामे केली आहेत. स्व.यशवंतराव चव्हाण (साहेब) हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते. त्यांनी कराडच्या विकासासाठी बहुमूल्य योगदान दिले आहे. त्या बरोबरच चव्हाण साहे...
कराड, ः जिल्हाधिकारी कार्यालयाने कराडच्या अर्थसंकल्पाबाबत वस्तूनिष्ठ अहवाल मागविला असतनाही कराडच्या नगराध्यक्षा सौ. रोहिणी शिंदे यांनी तो दिलेला नाही. अर्थसंकल्पा बाबत अहवाल द्यावा अशी कोणतीही नोटीस मिळालेली नसल्याचे त्या धादांत खोट बोलून कराडकरांची, पालिकेची व मतदारांची फसवणूक करत आहेत. त्याची नैतिक जबाबदारी स्विकारून त्यांनी त्याचा जनतेसमोर खुलासा करावा, असे आव्हान ...
स्व. आप्पासाहेबांच्या विचारांचा वारसा ही संस्था जोपासत असून, कृष्णा बँकेचा विस्तार पूर्ण महाराष्ट्रात करण्याचा आमचा मनोदय आहे. येणाऱ्या ३ वर्षात कृष्णा आर्थिक परिवार २००० कोटींचा टप्पा गाठेल - डॉ. अतुल भोसले
मालखेड ता.कराड येथे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व आ.पृथ्वीराज चव्हाण बाबा यांच्या वाढदिवसानिमित्त व पै.सौरभ माने यांच्या स्मरणार्थ भव्य वन हाफ पिच टेनिस बॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दि.२० मार्चेपासून या स्पर्धे होणार असून आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.प्रथम क्रमांक ११,१११ विक्रम शिवदास व देवदास माने यांच्याकडून ,द्वितीय क्रमांक ७,७७७ सरपंच इंद्रजित ठोंबरे ,उप...
कराड ः कोपर्डे हवेली ता. कराड येथे पिस्टल व गावठी कट्ट्याची विक्री करण्यास आलेल्या एकास कराड तालुका गुन्हे प्रकटीकरण शाखेने अटक केली. त्याच्याकडून पिस्टलसह गावटी कट्टा व दोन जिवंत काडतुसे अशी 1 लाख 20 हजारांची शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. त्याला मंगळवारी न्यायालयात हजर केले असता तीन दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अभिजीत उर्फ पप्पू लक्ष्मण मोरे (वय 25, रा. तारगाव, ता. कोरेगा...