पुणे-बंगळुरु महामार्गावर टोल भरण्याच्या कारणावरुन कराड जवळ असणाऱ्या तासवडे टोलनाक्यावर 12 ते 15 जणांनी सहा जणांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन शिवीगाळ करत धमकी दिल्याची घटना रात्रीच्या सुमारास घडली आहे.
ठोसेघर, ता. सातारा येथे तीन बछड्यासह वाघीण फिरत असत्याला व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित होत आहे. या व्हिडीओची गंभीर दखल घेऊन सातारा तालुका वन विभागाच्या पथकाने मंगळवारी रात्री ठोसेघर व चाळकेवाडी परिसरात शोधमोहीम हाती घेतली असता, या परिसरात बछड्यासह वाघिणीच्या कोणत्याही पाऊलखुणा, विष्ठा अथवा इतर खुणा आढळून आल्या नाहीत.
शाळकरी मुलीला लज्जा उत्पन्न होईल असे गैरवर्तन केल्याप्रकरणी दत्तात्रय किसन माने (वय 47, रा. ढवळेवाडी पो.निंभोरे ता.फलटण) याला सातारा जिल्हा न्यायालयात 3 वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली. दरम्यान, याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल होता.
यातील दोघे खंडाळा येथील कंपनीत कामाला होते. मटका, जुगाराचे व्यसन लागल्याने त्यांनी उधारी केली होती. उसने पैसे घेतलेले लोक वारंवार पैसे मागत असल्याने ते पैसे फेडण्यासाठी संशयितांनी पुणे येथील गुंडांना सुपारी देवून पैसे लुटण्याची आयडीया दिली. संबंधित कंपनीद्वारे रोख पैसे कामगारांना दिले जात असल्याने त्या पैशावरच दरोडा टाकण्याचा कट शिजवला.
पीडित मुलगी पंधरा वर्षीय असून सध्या ती माध्यमिक शिक्षण घेत आहे. काही दिवसांपूर्वी संबंधित मुलीचा फोटो दोन युवकांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटच्या स्टेटसला ठेवला होता. तसेच त्यावर आक्षेपार्ह मजकूर लिहिला होता. ही बाब संबंधित मुलीच्या नातेवाईकांच्या निदर्शनास आली. त्यामुळे त्यांनी कराड शहर पोलिस ठाण्यात याबाबतची तक्रार दिली आहे.
कराड : वहागाव-बेलवडे हवेली ता. कराड गावच्या हद्दीत पुणे-बेंगलोर महामार्गावर आयशर, ट्रक आणि कारचा तिहेरी अपघात घडल्याची घटना घडली. समोरील कारने अचानक ब्रेक मारल्याने पाठीमागून आलेल्या आयशरने कारला व आयशरला त्यापाठीमागे असलेल्या ट्रकने धडक दिली. मंगळवारी सकाळी ११ वाजता झालेल्या या अपघातात ट्रक चालक गंभीर जखमी झाला आहे.याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, पुणे-बेंगलोर ...
भुविकास बॅक चौकातील पानटपरीच्या आडोशाला जुगाराचा खेळ सुरू होता. यांची माहिती शाहूपुरी पोलीसांना मिळताच पोलीसांनी छापा टाकला. यावेळी संशयित गणपत दगडू कुंभार (वय 69 रा. मेढा), शहाजी उत्तम कदम (वय 39 रा. किन्हई), सुभाष गुलाब बनसोडे (वय 68 रा. डबेवाडी), राकेश केशव माने (वय 34 रा. डबेवाडी), पूंडलिक मल्लाप्पा मंगसुळे यांना ताब्यात घेतले.
गोडोली येथील शिवशोभा हाईट्स मध्ये राहत असलेला फिर्यादी निकेतन दराप्पा ढगे (वय 26) याच्या रूमचा दरवाजा उघडून आत प्रवेश करत अज्ञात चोरटय़ाने वन प्लस व व्हीवो कंपनीचा मोबाईल असा एकून 35 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला.
ही सोन्याची बांगडी सव्वा तोळे वजनाची होती. तिची किंमत 30 हजार रूपये होती. या अज्ञात चोरटय़ाविरूद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार जाधव करत आहे.
शौचालयाची तोडफोड करून नुकसान केले आहे. या नुकसानी विरूद्ध शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार ढमाळ करत आहेत.