maharashtra

कार्वेत मेडीकलसह बंद घरावर चोरट्यांचा डल्ला

कुलूप तोडून ५० हजाराचे साहित्य व ऐवज लंपास

Thieves raid a closed house with Corvette Medical
कार्वे, ता. कराड येथे चोरट्यांनी मेडीकल दुकानासह एका घरात डल्ला मारून सुमारे ५० हजाराचे साहित्य व ऐवज लंपास केला. बुधवारी २९ रोजी रात्री ही घटना घडली.

कराड : कार्वे, ता. कराड येथे चोरट्यांनी मेडीकल दुकानासह एका घरात डल्ला मारून सुमारे ५० हजाराचे साहित्य व ऐवज लंपास केला. बुधवारी २९ रोजी रात्री ही घटना घडली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, कार्वे येथे धनाजी राजाराम थोरात हे कुटूंबासह वास्तव्यास आहेत. बुधवारी २९ रोजी रात्री जेवण झाल्यानंतर कुटूंबातील सर्वजण झोपी गेले. गुरूवारी ३० रोजी सकाळी ७  वाजण्याच्या सुमारास धनाजी थोरात यांना जाग आली. त्यांनतर त्यांनी त्यांच्या राहत्या घराशेजारील त्यांच्या जुन्या घराकडे जाऊन पाहिले असता, घराचे कुलूप काढलेले दिसून आले. त्यावरून घरात पाहिले असता त्यांना कपाटातील साहित्य विस्कटलेले दिसले. तसेच चोरट्यांनी ४ हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी, २० हजार रुपयाचे गंठण, तसेच २ हजाराची रोकड चोरीस गेल्याचे त्यांना दिसले. त्याचबरोबर धनाजी थोरात यांच्या घरापासून काही अंतरावर असलेल्या गणेश मेडिकलमध्येही चोरट्यांनी डल्ला मारला. सदर मेडिकलच्या शटरची कुलूपे तोडून चोरट्यांनी रोकड लंपास केली. शिवाय, अन्य एका घरातही चोरीचा प्रयत्न करण्यात आला आहे. याबाबत धनाजी थोरात यांनी कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून त्यनुसार अज्ञातावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.