एकाच्या मृत्यूप्रकरणी चारचाकी चालकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सातारा : एकाच्या मृत्यूप्रकरणी चारचाकी चालकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा ते पुणे रस्ता रायगाव, ता. सातारा गावच्या हद्दीत दुचाकीची अज्ञात चारचाकी गाडीला पाठिमागून धडक बसली. यात दुचाकीस्वार अजय उर्फ नागेश अर्जुन भिंतडे (वय 35, रा. भिवडी, ता. पुरंदर, जि. पुणे) याचा मृत्यू झाला. ही घटना दि. 11 रोजी रात्री 1 वाजण्यापूर्वी घडली. सातारा तालुका पोलीस ठाण्यात शिवाजी विनायक झेंडे (रा. झेंडेवाडी, ता. पुरंदर) यांनी फिर्याद दिली आहे. तपास पो ह. वायदंडे करत आहेत.


