maharashtra

मलटण येथे दोन ठिकाणी घरफोडी


मलटण, ता. फलटण येथे दोन ठिकाणी घरफोडी झाल्याच्या घटना फलटण शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आल्या आहेत.

सातारा : मलटण, ता. फलटण येथे दोन ठिकाणी घरफोडी झाल्याच्या घटना फलटण शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आल्या आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 16 ते 17 डिसेंबर दरम्यान हेमलता चव्हाण हायस्कूल समोरील मलटण तालुका फलटण येथील मोनाली रोहित खुंटे वय 29 यांच्या घराच्या दरवाजाचा अज्ञात चोरट्याने तोडून घरातील 21हजार 300 रुपये रोख आणि पार्लरच्या मशीन्स घरफोडी करून चोरून नेल्या.

दुसऱ्या घटनेत उल्हास दत्तात्रय फडतरे रा. हरिभाऊ मंदिर शेजारी, मलटण, ता. फलटण यांच्या किराणामालाच्या दुकानातून चार हजार पाचशे रुपये किमतीचे कॅडबरी चॉकलेट्स आणि रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी चोरी करून नेली आहे.

या दोन्ही घटनांची नोंद फलटण शहर पोलीस ठाण्यात झाली असून पोलीस नाईक घाडगे अधिक तपास करीत आहेत.