maharashtra

रेकार्ड वरील गुन्हेगाराकडून गावठी पिस्टल, राउंड व मोटार सायकल जप्त

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

पोलीस रेकार्डवरील तडीपार केलेल्या गुन्हेगारांकडून दोन गावठी पिस्टल, दोन जिवंत राऊंड व 1 मोटार सायकल जप्त करून त्याला अटक करण्यास आली आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने केली. त्याच्याकडून 1 लाख 70 हजार 400 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सातारा : पोलीस रेकार्डवरील तडीपार केलेल्या गुन्हेगारांकडून दोन गावठी पिस्टल, दोन जिवंत राऊंड व 1 मोटार सायकल जप्त करून त्याला अटक करण्यास आली आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने केली. त्याच्याकडून 1 लाख 70 हजार 400 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
परशुराम रमेश करवले (वय 23, रा. कराड, सध्या रा. आटपाडी जि. सांगली) असे त्यांचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरूण देवकर यांना एक तडीपार गुन्हेगार शेणवडी (ता. माण) गावच्या हद्दीत शेणवडी फाटा येथे गावठी पिस्टल विक्री करीता येणार आहे, अशी माहिती मिळाली. या माहिती च्या आधारे पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी शेणवडी फाटा येथे सापळा लावला. यावेळी परशुराम करवले हा मोटार सायकलवरून तिथे आला. पोलीसांनी त्याला ताब्यात घेतले आणि त्यांची अंगझडती घेतली. यावेळी त्याच्या ताब्यात दोन देशी बनावटीच्या पिस्टल, दोन जिवंत काडतुस (राउंड) व एक मोपेड गाडी असा एकूण 1 लाख 70 हजार 400 रूपये किंमतीचा माल हस्तगत करून जप्त केला. त्याला अटक करून म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील, पोलीस अंमलदार उत्तम दबडे, अतिश घाडगे, संतोष पवार, संतोष सपकाळ, शरद बेबले, साबीर मुल्ला, लक्ष्मण जगधने, प्रविण फडतरे, निलेश काटकर, मुनीर मुल्ला, गणेश कापरे, विशाल पवार, मोहन पवार, पृथ्वीराज जाधव, रोहित निकम, सचिन ससाणे, वैभव सावंत, मयूर देशमुख, स्वप्नील दौंड, धीरज महाडीक, मोहसीन मोमीण, शिवाजी गुरव यांनी सहभाग घेतला.