ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातारा तालुक्यातील 16 जणांना सातारा तालुक्यात प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी करण्यात आली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून देण्यात आली.
सातारा : ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातारा तालुक्यातील 16 जणांना सातारा तालुक्यात प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी करण्यात आली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून देण्यात आली.
दि. 18 डिसेंबर ते दि. 20 डिसेंबर या कालावधीत सातारा तालुक्यातील एकूण 19 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणुकीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता सातारा तालुक्यात होऊ घातलेल्या ग्रामपंचायत हद्दीत अवैध व्यवसाय करणार्या श्रीरंग नारायण आवळे, शंकर जगन्नाथ देशमुख, विक्रम राजेंद्र आवळे, जमीर नजीर मुलाणी, समीर नजीर मुलाणी, फरीदा पटेल सर्व रा. मालगाव, ता. सातारा, विक्रांत सर्जेराव साळुंखे, रा. आरळे, ता. सातारा, किरण भीमराव साबळे, तुषार शंकर तपासे, गणेश बबन कोरडे, रमेश दिनकर दुदस्कर सर्व रा. माळ्याचीवाडी, ता. सातारा, सतीश बजरंग वाघमळे, राहणार कण्हेर, ता. सातारा, भरत ज्ञानदेव राजे रा. कोंढवली, ता. सातारा, आनंदा तुकाराम मोरे रा. राजापुरी, ता. सातारा, भरत बापू घाडगे, किशोर जयवंत माने दोघेही रा. देगाव, ता. सातारा दि. 17 डिसेंबर पासून दि. 21 डिसेंबर पर्यंत तालुक्यामध्ये प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी करण्यात आला आहे. संबंधित 15 जणांनी दि. 18 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत आपले मतदान करून सातारा तालुका परिसरात थांबू नये अथवा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.


