उसने पैसे न दिल्याच्या कारणातून योगेश इंदलकर याला वेण्णानगर ता. सातारा या गावच्या हद्दीत दि. २१ रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली. याप्रकरणी निकीता संतोष फाळके रा. शानबाग शाळेच्या मागे, दौलतनगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुरज रजपुत रा. बुधवार नाका याच्यावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, पोलिसांनी तपासाअंती निकीता फाळके हिलाच सहआरोपी केल्याची माहिती सुत्रांनी दिली.
सातारा : उसने पैसे न दिल्याच्या कारणातून योगेश इंदलकर याला वेण्णानगर ता. सातारा या गावच्या हद्दीत दि. २१ रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली. याप्रकरणी निकीता संतोष फाळके रा. शानबाग शाळेच्या मागे, दौलतनगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुरज रजपुत रा. बुधवार नाका याच्यावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, पोलिसांनी तपासाअंती निकीता फाळके हिलाच सहआरोपी केल्याची माहिती सुत्रांनी दिली.
याबाबत मिळालेली माहिती अशी, यातील मुळ फिर्यादी निकीताकडून जखमी योगेश याने उसने पैसे घेतले होते. मात्र, ते पैसे परत करण्यास तो टाळाटाळ करत असल्याने निकीताने पैसे वसूल करण्यासाठी सुरज याला पाठवले होते. दि.२१ रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास सुरज हा योगेशकडे निकीताचे उसने पैसे मागण्यासाठी वेण्णानगर परिसरात गेला होता. यावेळी योगेश इंदलकर याने सुरज रजपुत याला शिवीगाळ केली. त्याचा राग मनात धरून सुरज याने त्याला दांडक्याने मारहाण करून गंभीर जखमी केले. जखमी इंदलकर याला सुरज यानेच साताऱ्यातील एका खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करून तो दुचाकीवरून पडल्याची खोटी माहिती रूग्णालय प्रशासनाला दिली होती. दरम्यान, संशयित निकीता फाळके हिनेच पोलीस तपासाची दिशा भरकटवण्याच्या हेतून सुरज याच्याविरोधात खुनाच्या प्रयत्नाची फिर्याद दिली होती. या घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी गणेश किंद्रे यांनी रूग्णालयात जखमीला भेट देत, निकीताकडे अधिक तपासाच्या सुचना केल्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांनी फिर्यादी निकीता हिला तपासाच्या केंद्रस्थानी ठेवत प्रश्नांची सरबत्ती केली असता, योगेशकडे असलेले उसने पैसे तो देत नसल्याने सुरजला पैसे वसूल करण्यासाठी पाठवल्याची कबुली दिल्याने पोलिसांनी तिला या गुन्ह्यात सहआरोपी केले. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत चौधरी हे करत आहेत.


