maharashtra

म. गांधी वाचनालयात वाचन प्रेरणा दिन विविध उपक्रमाने साजरा


महात्मा गांधी सार्वजनिक वाचनालय मेढा यांच्यावतीने १५ ऑक्टोबर भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस "वाचन प्रेरणा दिन" म्हणून वाचनालयाच्या स्व. विजया थत्ते सभागृहात मान्यवरांच्या व शालेय विद्यार्थ्यांच्या उपस्थीतीत विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला.

मेढा : महात्मा गांधी सार्वजनिक वाचनालय मेढा यांच्यावतीने १५ ऑक्टोबर भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस "वाचन प्रेरणा दिन" म्हणून वाचनालयाच्या स्व. विजया थत्ते सभागृहात मान्यवरांच्या व शालेय विद्यार्थ्यांच्या उपस्थीतीत विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला.
प्रारंभ जावली पंचायत समितीचे माजी उपसभापती कांतीभाई देशमुख यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमा पुजन करून करण्यात आला, यावेळी प्राथमिक शिक्षक आणि शिक्षिका उपस्थित होते.
कार्यक्रमात आदर्श शिक्षिका शिल्पा फरांदे, संजिवनी मुळे, सरोजिनी राक्षे, पञकार भास्कर धनावडे यांनी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या आठवणी सांगुन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी पुस्तक प्रदर्शन भरविण्यात आले होते. उपस्थीत विद्यार्थ्यांनी थोर, महापुरूषांच्या आत्मचरित्राचे वाचन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे कार्याध्यक्ष नारायणराव शिंगटे गुरुजी यांनी केले.
कार्यक्रमास सचिव धनंजय पवार, अंतर्गत हिशोब तपासणीस विठ्ठल देशपांडे, संचालक रघुनाथ जवळ, शशिकांत कदम, अशोक दिक्षित, संचालिका स्वाती दिक्षित, शैला सपकाळ उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष पत्रकार सुरेश पार्टे, सांस्कृतिक विभागाच्या अध्यक्षा शोभा शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रंथपाल आशा मगरे, सहायक ग्रंथपाल इमताज शेख, लिपिक माधवी कदम यांनी विशेष परीश्रम घेतले, तर संचालक विठ्ठल देशपांडे यांनी आभार मानले.