maharashtra

जन्मापूर्वीच अर्भकाची विल्हेवाट लावल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा


जन्मापूर्वीच अर्भकाची विल्हेवाट लावल्याप्रकरणी दोघांवर ढेबेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सातारा : जन्मापूर्वीच अर्भकाची विल्हेवाट लावल्याप्रकरणी दोघांवर ढेबेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पाटण तालुक्यातील एका प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्मचारी असलेल्या एकाची मुलगी 34 आठवड्यांची कुमारी गर्भवती राहिल्याने ही गोष्ट लपवण्यासाठी बेकायदेशीररित्या मुलीचे 34 आठवड्यांचे अर्भक ओढून काढून, त्याचा गळा कापून ते नष्ट करण्याच्या उद्देशाने लपवून ठेवल्याप्रकरणी पिता आणि मुलीवर ढेबेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ए. एस. चौधरी करीत आहेत.