किरकोळ कारणावरून एकाला मारहाण केल्याप्रकरणी हॉटेल मालकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सातारा : किरकोळ कारणावरून एकाला मारहाण केल्याप्रकरणी हॉटेल मालकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहरातील दौलत नगर येथील शानबाग शाळेच्या समोर असलेल्या जगदंबा हॉटेलचे मालक ओंकार किर्दत रा. करंजे, सातारा यांनी दिनांक 19 जानेवारी रोजी साडेदहा वाजण्याच्या सुमारास अजित जगन्नाथ पाटील यांना किरकोळ कारणावरून वाद करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत शिवीगाळ केली. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून अधिक तपास पोलीस हवालदार सणस करीत आहेत.


