सातारा येथील कृष्णानगर वसाहतीमध्ये असलेल्या जुन्या वसाहतीच्या क्वॉर्टर्समधून १३ हजार रुपयांच्या लोंखडी साहित्याची चोरी झाली आहे. याबाबतची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दिल्यानंतर अज्ञातावर गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा : सातारा येथील कृष्णानगर वसाहतीमध्ये असलेल्या जुन्या वसाहतीच्या क्वॉर्टर्समधून १३ हजार रुपयांच्या लोंखडी साहित्याची चोरी झाली आहे. याबाबतची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दिल्यानंतर अज्ञातावर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, श्रेयस मोहनराव देशमुख (वय २८) हे पाटबंधारे विभागात कर्मचारी आहेत. त्यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, शनिवार, दि. ८ रोजी रात्री नऊ ते दि. १0 रोजी सकाळी नऊ या कालावधीत कोणीतरी अज्ञाताने कृष्णानगर वसाहतीमध्ये असलेल्या जुन्या वसाहतीच्या क्वॉर्टर्समधून लोखंडी खिडक्या, बॉस चेअर अशी तेरा हजार रुपयांच्या साहित्याची चोरी केली. याबाबतची तक्रार श्रेयस देशमुख यांनी सोमवार, दि. १0 रोजी दुपारी सव्वातीन वाजता सातारा शहर पोलीस ठाण्यात दिली. याप्रकरणी अज्ञातावर गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस नाईक दळवी करत आहेत.


