maharashtra

समर्थनगर येथील भिंतीचे अतिक्रमणं पालिकेने हटविले

पोलीस बंदोबस्तात कर्मचारी व रहिवासी यांच्यात वादावादी

करंजे तर्फ सातारा (समर्थनगर) येथील एका निवासी इमारती लगतच्या संरक्षक भिंतीचे अतिक्रमणं पालिकेने गुरुवारी पाडले. यावेळी अतिक्रमणं मोहिमेला काहीजणांनी हरकत घेतल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

सातारा : करंजे तर्फ सातारा (समर्थनगर) येथील एका निवासी इमारती लगतच्या संरक्षक भिंतीचे अतिक्रमणं पालिकेने गुरुवारी पाडले. यावेळी अतिक्रमणं मोहिमेला काहीजणांनी हरकत घेतल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी पोलीस बंदोबस्त तैनात असताना वर्दळीच्या रस्त्यावरील अतिक्रमण जेसीबीने पाडण्यात आले.
करंजे तर्फ सातारा 405 / 23 H/25B येथील सार्वजनिक रस्ता अनाधिकाराने सिंमेटचे ब्लॉक उभे केले होते. या संदर्भात सदनिका धारक व सातारा पालिका यांच्यात न्यायालयीन वाद सुरू होते. मात्र सर्वोच्च न्यायालयात निकाल पालिकेच्या बाजूने आला. वहिवाटीच्या रस्त्याला हरकत घेतली जात असल्याच्या तक्रारी पालिकेला प्राप्त होत्या. मुख्याधिकारी अभिजीत बापट यांच्या सूचनेनुसार अतिक्रमणं निरीक्षक प्रशांत निकम व पथकाकडून जेसीबी लावून रस्त्याचे सिमेंटचे ब्लॉक उध्वस्त करण्यात आले. यावेळी कर्मचारी व रहिवाशी यांच्यात काही काळ शाब्दीक चकमक झाली. मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करून तणाव वाढू दिला नाही. समर्थनगरकडे जाणारा रस्ता मोकळा करण्यात आल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.