सर्पदंशाने एकाचा मृत्यू झाल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
सातारा : सर्पदंशाने एकाचा मृत्यू झाल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, एक सप्टेंबर रोजी बारा वाजण्याच्या सुमारास दिलीप शंकर कदम वय 61 राहणार खेड तालुका सातारा हे दिनांक 25 ऑगस्ट रोजी खेड गावातील शेतामध्ये गेले असता पायास सर्पाचा दश झाल्याने पाय सुजला होता. त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची खबर डॉ. जयेंद्र जाधव यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार गायकवाड करीत आहेत.


