maharashtra

बसस्थानक परिसरातून युवक बेपत्ता


बसस्थानक परिसरातून युवक बेपत्ता झाल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

सातारा : बसस्थानक परिसरातून युवक बेपत्ता झाल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 16 मार्च रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास सातारा एसटी स्टँड परिसरातून योगेश महादेव पाटोळे वय 27, राहणार डाकमोडे, ता. खटाव जि. सातारा हा युवक कोणास काही एक न सांगता निघून गेला आहे. याबाबतची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली असून अधिक तपास सहाय्यक फौजदार डी. जी. पवार करीत आहेत.