दुचाकी पेटवल्या प्रकरणी एकावर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सातारा : दुचाकी पेटवल्या प्रकरणी एकावर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, 24 ऑगस्ट रोजी विशाल श्रीकांत घोडके राहणार शनिवार पेठ, कराड याने किरण शंकर पवार वय 32, राहणार शनिवार पेठ, कराड यांचे घर जाळण्याच्या उद्देशाने घरासमोर पार्क केलेली बजाज कंपनीची डिस्कव्हर ही दुचाकी (क्र. एमएच 50 डी 2105) पेटवून दिली. याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक पाटील अधिक तपास करीत आहेत.


