maharashtra

विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा


विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी तिघांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सातारा : विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी तिघांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, 12 नोव्हेंबर 2021 पासून प्रियंका अनिकेत जाधव वय 32 राहणार बारामती, पुणे सध्या राहणार वडूथ, तालुका सातारा या विवाहितेचा पती अनिकेत दिलीप जाधव, सासू छाया दिलीप जाधव, सासरे दिलीप महादेव जाधव यांनी शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी तिघांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार डोंबाळे करीत आहेत.