पाऊस व वाऱ्यामुळे झेंडूचे फड भुईसपाट
वाऱ्यासह पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे झेंडू उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त
लागवडी पासून पाऊस आणि ढगाळ वातावराणामुळे खटाव तालुक्यातील झेंडू उत्पादक शेतकरीवर्ग अडचणीत सापडला आहे. सुर्यप्रकाशाअभावी बागा फुलल्या नसल्याने उत्पन्नात मोठी घट होणार असल्याने उत्पादन खर्चही निघेल की नाही, या चिंतेने शेतकरीवर्ग ग्रासला असून बुधच्या काही भागात पाऊस व वार्यामुळे अनेक झेंडूचे फड झोपले असून झेंडू उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.
पुसेगाव : लागवडी पासून पाऊस आणि ढगाळ वातावराणामुळे खटाव तालुक्यातील झेंडू उत्पादक शेतकरीवर्ग अडचणीत सापडला आहे. सुर्यप्रकाशाअभावी बागा फुलल्या नसल्याने उत्पन्नात मोठी घट होणार असल्याने उत्पादन खर्चही निघेल की नाही, या चिंतेने शेतकरीवर्ग ग्रासला असून बुधच्या काही भागात पाऊस व वार्यामुळे अनेक झेंडूचे फड झोपले असून झेंडू उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.
गणेशोत्सव, दसरा, दिपावलीच्या सणासूदीच्या काळात झेंडू फुलांना सर्वत्र मोठी मागणी असते. उत्तर खटाव परिसरातील काटेवाडी, करंजओढा, डिस्कळ, पसूचामळा, ललगुण, नागनाथवाडी, राजापूरसह बुध परिसरातील शेतकरी खरीप हंगामातील पारंपारिक पीकांना फाटादेत गेली दहा वर्षापासून फुलशेतीकडे वळले असून कमी कालावधील भरपूर नफा मिळवून देणारे पीक म्हणून झेंडूची मोठ्या प्रमाणात लागवड करीत आहेत. या वर्षी शेतक-यांनी लागवडीसाठी पिवळ्यावाणासह स्टॅाल आॅरेंज, अष्टगंधा, इनोव्हा, कलकत्ता आदी अधिक उत्पादन देणा-या वाणाची निवड करून गादी वाफ्यावर रोप तयार करून लागवड केली आहे, तर अनेक शेतक-यांनी कोरेगाव, जोशी विहीर येथील नर्सरीतून अष्टगंधा दोन रूपये सत्तर पैसे, इनोव्हा, स्टॅाल आॅरेंज एक रूपया सत्तर पैसे या दराने खरेदी करून लागवड केली आहे. उत्तर खटाव परिसरात सध्या चारशे एकरावर झेंडूची लागवड झाली असून या पिकासाठी बियाणे, खते, आैषधे मजूरी व तोडणीसह एकरी सत्तर हजार रूपये खर्च होत असल्याचे बुध, काटेवाडी येथील शेतकऱ्यांनी सांगितले. तयार माल मुंबई, पुणे, व स्थानिक बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवला जातो. मात्र यावर्षी पाउस आणि ढगाळ वातावरणाचा फटका झेंडू पिकाला बसला असून अपेक्षित उत्पादन हाती येणार नसल्याने झेंडू उत्पादक शेतकरी कर्जबाजारी होण्याच्या भीतीने धास्तावला आहे. तसेच बुध च्या काही भागात पाऊस व वार्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या बागा जमिनदोस्त झाल्या आहेत.


