maharashtra

अल्पवयीन मुलीवर अत्याचार


कोरेगाव तालुक्यातील अल्पवयीन शालेय मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी त्याच गावातील ३५ वर्षीय युवकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सातारा : कोरेगाव तालुक्यातील अल्पवयीन शालेय मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी त्याच गावातील ३५ वर्षीय युवकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
गोडोली नाका व वाढेफाटा ते लोणंदकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाटखळ, ता. सातारा येथील शिवशाही लॉजमध्ये दि. २६ ऑक्टोबरला दुपारी १२.४५ ते दुपारी ३ वाजण्याच्या दरम्यान हा प्रकार घडला. संशयित आरोपीने अल्पवनीय मुलीस फूस लावून दुचाकीवरुन पाली येथील खंडोबाचे दर्शन घेण्यासाठी नेले. तेथून आल्यानंतर नंतर जबरदस्तीने अत्याचार केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. सहायक पोलीस निरीक्षक पालवे तपास करत आहेत.