maharashtra

मद्यप्राशन करून आरडाओरडा केल्या प्रकरणी तिघांवर गुन्हे


Crimes against three persons for shouting under the influence of alcohol
इंदोली, ता. कराड गावच्या हद्दीत इंदोली चौक येथे मद्यप्राशन करून आरडाओरडा केल्या प्रकरणी तीन जणांवर उंब्रज पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

कराड : इंदोली, ता. कराड गावच्या हद्दीत इंदोली चौक येथे मद्यप्राशन करून आरडाओरडा केल्या प्रकरणी तीन जणांवर उंब्रज पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १५ रोजी ७.१५ वाजण्याच्या सुमारास इंदोली गावच्या हद्दीत इंदोली चौक येथे दुर्गा देवी विसर्जनावेळी गणेश मनोहर कुर्लेकर, वय ४८, संतोष राजाराम यादव, वय २५, सोमनाथ संजय चव्हाण, वय २२ सर्व राहणार इंदोली ता कराड यांनी मद्यप्राशन करून आरडाओरडा करत सरकारी कामाला अटकाव केल्याची तक्रार पोलीस कॉन्स्टेबल गजानन मनोहर कुर्लेकर यांनी उंब्रज पोलीस ठाण्यात दिली.