maharashtra

पत्नीचा जाचहाट केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा


पत्नीचा जाचहाट केल्याप्रकरणी तिघांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सातारा : पत्नीचा जाचहाट केल्याप्रकरणी तिघांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि.१५ ऑक्टोंबर २०२० ते दि.१४ फेब्रुवारी २०२२ दरम्यान सौ अनिता रवींद्र मोटे वय ४५, रा. यशवंतनगर, शाहूपुरी, सातारा हिला जातीवाचक बोलत तुमची फक्त घरात साफसफाई करण्याची लायकी आहे असे म्हणत पती रवींद्र अरविंद मोटे, मुलगा आमरेंद्र रवींद्र मोटे, सून प्रांजली आमरेंद्र मोटे यांनी शिवीगाळ, दमदाटी केल्याची तक्रार शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.