कराड शहरात लागलेल्या भीषण आगीत अनेक घरे जळून खाक
चार सिलेंडर फुटल्याने खळबळ; तीन महिला जखमी
शहरातील एका वस्तीला मध्यरात्री दीड वाजता अचानक आग लागल्याने 20 ते 25 घरे जळून खाक झाली. या आगीमुळे चार सिलेंडरचा स्फोट झाल्याने आगीने आणखीनच रौद्र रूप धारण केल्याने एकच खळबळ उडाली. अचानक लागलेल्या आगीने रौद्ररूप धारण केल्याने परिसरात असणारी छोटी घरे तसेच व्यावसायिकांची खोकी या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने मोठी हानी झाली आहे. या घटनेत तीन महिलांना दूखापत झाली आहे.
कराड : शहरातील एका वस्तीला मध्यरात्री दीड वाजता अचानक आग लागल्याने 20 ते 25 घरे जळून खाक झाली. या आगीमुळे चार सिलेंडरचा स्फोट झाल्याने आगीने आणखीनच रौद्र रूप धारण केल्याने एकच खळबळ उडाली. अचानक लागलेल्या आगीने रौद्ररूप धारण केल्याने परिसरात असणारी छोटी घरे तसेच व्यावसायिकांची खोकी या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने मोठी हानी झाली आहे. या घटनेत तीन महिलांना दूखापत झाली आहे. कराड नगरपरिषद अग्निशामक दल तसेच कृष्णा हॉस्पिटलच्या अग्निशामक दलाने आगीवर नियंत्रण मिळवले आहे.
गेल्या दहा वर्षात या वस्तीत आग लागण्याची ही तिसरी घटना असून यापूर्वीही आग लागून जीवित व वित्तहानी झाली होती. त्यावेळी अनेकांचे संसार उघड्यावर पडले होते. काल मध्यरात्री लागलेल्या आगीमुळे या वस्तीत एकच खळबळ उडाली. अनेक महिला, लहान मुले आक्रोश करीत सूरक्षित स्थळी पळत होती. तात्काळ अग्निशामक दलाला पाचारण केल्याने आग आटोक्यात आली आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी डाॅ. रणजीत पाटील, पोलीस निरीक्षक बी आर पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करीत सूचना केल्या. तत्पूर्वी माजी नगरसेवक फारूख पटवेकर, विजय यादव यांनी घटनास्थळावर आग विझवण्यासाठी कार्यकर्त्यांसह मोठी मदत केली. अनेक घरातील साहित्य ही बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले.
कोर्ट ड्यूटीवर असणार्या होमगार्डची सतर्कता...
आग लागल्याने वस्तीतील काही रहिवासी, महिला यांनी रस्त्यावर पळत येऊन आक्रोश करताच येथिल कोर्टात रात्रपाळीसाठी ड्यूटीवर असणार्या सूहास देवकर या होमगार्डने धाडसाने वस्तीत धाव घेत तेथिल घरामध्ये घूसून अनेकांना जागं करीत घराबाहेर पडण्यासाठी मदत करुन अग्निशामक दलाला सूचना दिली.शाळा क्रमांक तीन मध्ये मिळाला तात्पूरता आसरा...
आग संपूर्ण वस्तीत लागल्याने सर्वांचे संसार उघड्यावर पडल्याने माजी नगरसेवक राजेंद्रसिंह यादव यांनी तात्काळ सूचना देत सर्वांची राहण्याची सोय येथिल नगरपरिषद शाळा क्रमांक तीन मध्ये केली. विजय यादव व मित्र परिवाराने तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदत करण्याचा मोठा प्रयत्न केला. या वस्तीतील सर्वांची राहण्याची सोय शाळेत करण्यात आली आहे.


