एसटी बस मध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एका पोलीस अधिकाऱ्यावर बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सातारा : एसटी बस मध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एका पोलीस अधिकाऱ्यावर बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, 17 ऑक्टोबर रोजी सकाळी साडेआठ ते सव्वानऊ वाजण्याच्या दरम्यान बारामती- कोल्हापूर या एसटी बस मध्ये महेश मारुती मगदूम वय 38 रा. सडोली, ता. करवीर, जिल्हा कोल्हापूर या पोलीस अधिकाऱ्याने सीटवर शेजारी बसलेल्या अल्पवयीन मुलीस तू कुठे राहतेस, कोणत्या कॉलेजला आहेस, कुठे चाललो आहेस, असे विचारत तिचा मोबाईल नंबर मागितला. मुलीने नकार दिला असता त्याने आपण फ्रेंड्स बोलूया व चॅटिंग करूया, असे म्हणत त्या मुलीच्या मनात लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. याबाबतची फिर्याद संबंधित मुलीने बोरगाव पोलीस ठाण्यात नोंदवली असून त्या पोलीस अधिकाऱ्यांवर पोक्सो सह विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.


