उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आवारात एजंटांकडून करण्यात आलेले अतिक्रमण मंगळवारी पालिकेच्या पथकाकडून काढण्यात आले. तीन एजंटांकडून फुटपाथवर उभारण्यात आलेले छत काढून फुटपाथ मोकळा करण्यात आला.
सातारा : उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आवारात एजंटांकडून करण्यात आलेले अतिक्रमण मंगळवारी पालिकेच्या पथकाकडून काढण्यात आले. तीन एजंटांकडून फुटपाथवर उभारण्यात आलेले छत काढून फुटपाथ मोकळा करण्यात आला.
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाजवळील अतिक्रमण नेहमीच चर्चेचा विषय ठरते. येथील हातगाड्या, टपऱ्यांवर पालिकेच्या अतिक्रमण विभागाने आजवर अनेकदा कारवाई केली आहे. मात्र, काही दिवसांत परिस्थिती पुन्हा ह्यजैसे थेह्ण होते. आता तर कार्यालयाच्या आवारात असलेल्या फुटपाथवर एजंटांनी बस्तान बसविले होते. या एजंटांची संख्या इतकी आहे की या ठिकाणाहून ये-जा करणेही अवघड बनते. सामाजिक कार्यकर्त्यांनी फुटपाथवरील एजंटांचे अतिक्रमण हटविण्याची मागणी पालिकेकडे केली होती.
मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्याकडून आदेश प्राप्त होताच अतिक्रमण हटाव पथकाने मंगळवारी दुपारी एजंटांकडून करण्यात आलेली सर्व अतिक्रमणे हटवून हा फुटपाथ मोकळा केला. या कारवाईत अतिक्रमण विभागाचे प्रमुख प्रशांत निकम यांच्यासह कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
संबंधित एजंटांना आमचा विरोध नाही. मात्र, फुटपाथवर बसून व्यवसाय करणे योग्य नाही. उपप्रादेशिक परिवहन विभागाने एजंटांना व्यवसायासाठी जागा द्यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.


