बसस्थानकाशेजारील सेवन स्टार इमारतीमध्ये असलेल्या मोबाईल शॉपीमध्ये घुसून व्यंकटेश सुभाष त्रिंबके (वय 22, रा. गडकर आळी, सातारा) या तरुणाच्या गळ्यावर ब्लेडने वार करण्यात आले. त्यानंतर संबंधिताने दुकानातील साहित्याची तोडफोड केली. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल केला आहे.
सातारा : बसस्थानकाशेजारील सेवन स्टार इमारतीमध्ये असलेल्या मोबाईल शॉपीमध्ये घुसून व्यंकटेश सुभाष त्रिंबके (वय 22, रा. गडकर आळी, सातारा) या तरुणाच्या गळ्यावर ब्लेडने वार करण्यात आले. त्यानंतर संबंधिताने दुकानातील साहित्याची तोडफोड केली. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल केला आहे.
ओम राजेंद्र गिरीगोसावी (रा. शुक्रवार पेठ, सातारा) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, व्यंकटेश त्रिंबके हा शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजता दुकानात बसला होता. त्यावेळी ओम गिरीगोसावी हा तेथे आला. दुकानातील कामगार युवतीला त्रिंबके त्रास देतो, या गैरसमजुतीतून त्याने तोडफोड करण्यास सुरुवात केली. त्याने दुकानातील लॅपटॉप, संगणकाचे नुकसान केले. त्यानंतर व्यंकटेशच्या गळ्यावर त्याने ब्लेडने वार करून गळा कापला. या प्रकारानंतर तो तेथून निघून गेला.
जखमी व्यंकटेशला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्याची प्रकृती सुधारत असल्याचे पोलिसांनी सांगितले. रुग्णालयातील पोलिसांनी व्यंकटेशचा जबाब नोंदविल्यानंतर ओम गिरीगोसावीवर गुन्हा दाखल केला.


