महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी प्रकरणी अज्ञातावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा : महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी प्रकरणी अज्ञातावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 27 फेब्रुवारी ते 1 मार्च दरम्यान अज्ञात इसमाने सातारा शहरा जवळील एका उपनगरात राहणाऱ्या महिलेस व्हाट्सअॅप कॉल करून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. याप्रकरणी अज्ञातावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक निंबाळकर करीत आहेत.


