ट्रान्सफॉर्मर फोडून त्यातील तांब्याची तार चोरून नेल्याप्रकरणी अज्ञात चोरट्यावर औंध पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सातारा : ट्रान्सफॉर्मर फोडून त्यातील तांब्याची तार चोरून नेल्याप्रकरणी अज्ञात चोरट्यावर औंध पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 27 ते 28 जानेवारी दरम्यान कोकराळे वीट भट्टी येथील गट नंबर 757 मधील धनाजी शंकर सावंत यांच्या शेतात असलेल्या ट्रान्सफॉर्मर मधील नटबोल्ट काढून, त्याचे झाकण खोलून, तसेच ऑइल सांडून ट्रान्सफॉर्मर चे नुकसान करून त्यातील सुमारे दीडशे किलो वजनाची वीस हजार रुपये किंमतीची तांब्याची तार अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. याप्रकरणी औंध पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस हवालदार पाटील अधिक तपास करीत आहेत.


