maharashtra

दुचाकी चालकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी कंटेनर चालकावर गुन्हा


Container driver charged with causing death of two-wheeler driver
पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर सातारा गावच्या हद्दीत कणसे ढाब्यासमोर दुचाकी चालकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या प्रकरणी कंटेनर चालकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सातारा : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर सातारा गावच्या हद्दीत कणसे ढाब्यासमोर दुचाकी चालकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या प्रकरणी कंटेनर चालकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. ७ एप्रिल रोजी साडे आठ वाजण्याच्या सुमारास पुणे बेंगलोर  राष्ट्रीय महामार्गावरुन निशांत बाबाजी पवार, वय ३३, रा. कुसुमकुंज सोसायटी, पनवेल हे दुचाकी क्रमांक एम.एच. ४६ ए. डब्ल्यू ०६४० वरून वडगाव हवेली, ता. कराड येथे जात असताना सातारा गावच्या हद्दीत असणाऱ्या कणसे धाब्याच्या समोर पाठीमागून आलेल्या कंटेनेरने दुचाकीला धडक देऊन झालेल्या अपघातात निशांत पवार यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी कंटनेर चालक महावीर शिकलगार रा. मोहनपुर, ता. जोरा, मध्य प्रदेश याच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.