जिल्ह्यातील दोन दारू अड्ड्यांवर छापे मारून पोलिसांनी सुमारे 1160 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
सातारा : जिल्ह्यातील दोन दारू अड्ड्यांवर छापे मारून पोलिसांनी सुमारे 1160 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, हवेली येथे घराच्या भिंतीच्या आडोशाला विजय हरीबा जाधव वय 41 यांच्याकडून 560 रुपये किमतीच्या दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. या गुन्ह्याची नोंद तळबीड पोलीस ठाण्यात झाली आहे.
दुसर्या घटनेत शिंगणापूर, तालुका माण गावच्या हद्दीत रामोशी आळी येथे घराच्या आडोशाला बाबुराव आबा मदने त्याच्याकडून सहाशे रुपये किमतीच्या देशी दारूच्या दहा बाटल्या हस्तगत करण्यात आल्या आहेत. या गुन्ह्याची नोंद दहिवडी पोलीस ठाण्यात झाली आहे.


