maharashtra

मारहाण केल्याप्रकरणी महिलेवर गुन्हा


Woman charged with assault
दांडक्याने मारहाण केल्याप्रकरणी एका महिलेवर शाहुपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सातारा : दांडक्याने मारहाण केल्याप्रकरणी एका महिलेवर शाहुपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि.१९ रोजी साडेसहा वाजण्याच्या सुमारास सातारा येथील जरंडेश्वर नाका परिसरात वैशाली आनंद भोसले, रा. करंजे पेठ, सातारा या महिलेने अशोक वसंत भोजने, वय ४७, राहणार भैरोबा मंदिराच्या शेजारी, करंजे पेठ, सातारा यांना शिवीगाळ करून दांडक्याने मारहाण केली. भांडणे सोडवण्यासाठी त्यांचा मुलगा अजिंक्य आला असता त्यालाही मारहाण केल्याची तक्रार शाहुपुरी पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.