प्रतिवर्षीप्रमाणे येथील ज्ञानविकास मंडळाच्यावतीने आदर्श माता सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शुक्रवार दि.३१ मार्च रोजी समर्थ सदन, राजवाड्याजवळ, सातारा येथे संध्याकाळी ५.३० वाजता होणार आहे.
सातारा : प्रतिवर्षीप्रमाणे येथील ज्ञानविकास मंडळाच्यावतीने आदर्श माता सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शुक्रवार दि.३१ मार्च रोजी समर्थ सदन, राजवाड्याजवळ, सातारा येथे संध्याकाळी ५.३० वाजता होणार आहे. या उपक्रमाचे मंडळाचे हे ३४ वे वर्ष आहे. आजपर्यंत मंडळाने १५० मातांना आदर्श माता म्हणून गौरवले आहे.
यावर्षी जिल्ह्यातील ४ आदर्श मातांचा सत्कार होणार असून त्यात सुनंदा प्रमोद वेदपाठक (रा.कराड), श्रीमती शीला सदाशिव मोरे (वाबळे) (रा.सातारा), श्रीमती सुभद्रा धर्माजी पवार (रा. आदर्की बु. ता. फलटण), श्रीमती कमल लक्ष्मण जीमन (मोहिते) (रा. सातारा) यांचा समावेश आहे. या सत्कार सोहळ्यासाठी जिल्ह्यातील नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन मंडळाच्यावतीने चाफेकर यांनी केले आहे.


