एका वृद्धेसह जिल्ह्यातून तीनजणी बेपत्ता झाल्याच्या तक्रारी संबंधित पोलीस ठाण्यांत दाखल झाल्या आहेत.
सातारा : एका वृद्धेसह जिल्ह्यातून तीनजणी बेपत्ता झाल्याच्या तक्रारी संबंधित पोलीस ठाण्यांत दाखल झाल्या आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 15 डिसेंबर रोजी 11 वाजण्याच्या सुमारास जानुगडेवाडी, ता. पाटण येथील राहत्या घरातून कलाबाई नायकु थोरात, वय 77 ही वृद्ध महिला मी बनपुरी, ता. पाटण येथील नाईकबा देवाला जाऊन येते असे सांगून निघून गेली ती अद्याप घरी परत न आल्याची तक्रार आनंदा गणपती थोरात यांनी ढेबेवाडी पोलीस ठाण्यात दिली आहे. दि. 20 डिसेंबर रोजी 10 वाजण्याच्या सुमारास कोडोली, ता. सातारा येथील गणेश चौक परिसरात असणार्या शिवाजीनगर येथून एक युवती कॉलेजला जाते असे सांगून घरातून निघून गेली ती अद्याप घरी परत न आल्याची तक्रार तिच्या पालकांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. दि. 20 डिसेंबर रोजी 11 वाजण्याच्या सुमारास बुधवार पेठ, कराड, ता. कराड येथुन पुजा तानाजी वाघमारे, वय 26 ही तिच्या आईला कपड्याच्या दुकानात जाते असे सांगून निघून गेली ती अद्याप घरी परत न आल्याची तक्रार उदयसिंह उत्तम थोरवडे यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.


