आर्थिक फसवणूक आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी एकावर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सातारा : आर्थिक फसवणूक आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी एकावर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अमोल प्रकाश राऊत वय 31 राहणार शिक्रापूर तालुका शिरूर जिल्हा पुणे यांना धनंजय बबन जाधव राहणार सुरवडी, तालुका फलटण यांनी कमिन्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड फलटण या कंपनीचे भंगाराचे कंत्राट मिळवून देतो, असे आमिष दाखवून एक लाख 80 हजार रुपये घेतले. मात्र कंत्राट न मिळाल्याने पैसे परत मागितले असता जाधव यांनी राऊत यांना जातीवाचक शिवीगाळ करून धमकी दिली. या घटनेची नोंद फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.


