भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात ऐकेरी भाषा वापरल्याच्या निषेधार्थ खासदार उदयनराजे समर्थकांनी पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर शेंद्रे गावानजीक नॅशनल हायवेवर टायर पेटवून रस्ता बंद केला आणि दानवे यांच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला.
सातारा : भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात ऐकेरी भाषा वापरल्याच्या निषेधार्थ खासदार उदयनराजे समर्थकांनी पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर शेंद्रे गावानजीक नॅशनल हायवेवर टायर पेटवून रस्ता बंद केला आणि दानवे यांच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला.
या घटनेची माहिती मिळताच सातारा तालुका वाहतूक पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत हायवेवर पेटवलेले टायर बाजूला करत रस्ता मोकळा केला.


