maharashtra

महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा


महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकाविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सातारा : महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकाविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 21 रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास सातारा शहर परिसरात राहणारी एक सिव्हिल इंजिनियर महिला सिमेंटचे व्यवहारातील राहिलेले पैसे मागण्यासाठी निरंजन सुरेश चौगुले रा. मंगळवार पेठ सातारा यांच्या घरी गेली असता चौगुले याने संबंधित महिलेशी असभ्य वर्तन करीत तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस हवालदार गायकवाड करीत आहेत.