अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर पोक्सो अंतर्गत सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सातारा : अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर पोक्सो अंतर्गत सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 31 जानेवारी रोजी सव्वा 11 वाजण्याच्या सुमारास पानमळेवाडी तालुका सातारा गावच्या हद्दीत असणाऱ्या केबीपी कॉलेजच्या परिसरात एका अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केल्याप्रकरणी रोहित राजेंद्र रसाळ रा. पाटखळ माथा, ता. सातारा याच्यावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात विनयभंगासह पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक मेणकर करीत आहेत.


