विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी चौघांवर वाई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सातारा : विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी चौघांवर वाई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 30 ऑगस्ट रोजी संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास एक विवाहिता बावधन, तालुका वाई येथे शेळ्या चारत असताना धनाजी बरमा कचरे, तानाजी बरमा कचरे, दादा बरमा कचरे, सोमा आण्णा कचरे सर्व रा. बावधन, तालुका वाई यांनी तिचा विनयभंग केला. या प्रकरणी वाई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून महिला पोलीस हवालदार एस. वाय. शिरतोडे अधिक तपास करीत आहेत.


