maharashtra

युवतीचे अपहरण


सैदापूर येथून एका युवतीचे अपहरण झाल्याची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.

सातारा : सैदापूर येथून एका युवतीचे अपहरण झाल्याची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 11 ऑक्टोबर रोजी पावणेचार ते चार वाजण्याच्या दरम्यान सैदापूर, गोसावी वस्ती, ता. सातारा येथून तीन अनोळखी इसमांनी एका युवतीचे अपहरण केल्याची फिर्याद मुलीच्या नातेवाईकांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंदवली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.